बिग ब्रेकिंग | इंदापूर तालुक्यातील डाळज मध्ये दहा ते बारा वाहनांचा अपघात,जिवितहानी नाही मात्र वाहनांचं नुकसान ! अशी घडली घटना

Dec 10, 2024 - 22:59
Dec 10, 2024 - 23:07
 0  3335
बिग ब्रेकिंग | इंदापूर तालुक्यातील डाळज मध्ये दहा ते बारा वाहनांचा अपघात,जिवितहानी नाही मात्र वाहनांचं नुकसान ! अशी घडली घटना

आय मिरर

इंदापूर मधून अपघाताची मोठी बातमी आहे. इंदापूर तालुक्यारील डाळज नंबर 1 येथे बगॅस वाहतुक करणारा ट्रॅक्टर पुणे सोलापूर मार्गावर पलटी झालाय.या पलटलेल्या ट्राॅली उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेत असताना एका बाजूने धिम्या गतीने वाहतूक सुरु होती. अशातचं पुण्याकडून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दहा ते बारा वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे.

ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडलीय.यात दहा ते बारा वाहनांच मोठं नुकसान झाले असून महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.दरम्यान ट्रक चालकाने मद्यपान केलं होतं का ? नेमका हा अपघात कसा घडला याचा तपास पोलिस करत आहेत.

एम एच 46 बी यू 9038 क्रमांकाचा हा ट्रक आहे.ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पाठीमागून वेगात येऊन पुढील वाहनांना जोरात धडक दिल्याबे दहा ते बारा वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे.सुदैवाने यात कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow