प्रवाशांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ थांबणार ! उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचे सत्र सुरु

आय मिरर
हायवेवर बसेसचा अपघात होवून आग लागण्याच्या घटना आता अधिक वाढताना पहायला मिळत आहेत.अशाच मुंबईहून बीडकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात होवून पाच जण ठार तर 23 जण जखमी झाल्याची घटना घडली होती.यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचे सत्र सुरु केलंय.
बीडमधून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी बीडमध्ये करण्यात आलीय.यामध्ये एका गाडीच्या मुळ बांधणीत छेडछाड करण्यात आल्याचे समोर आलंय. या गाडीचा परवाना रद्द केला जाणार आहे.तर याबरोबरच इतर गाड्यांनाही दंड करण्यात आला. दरम्यान, बीडमधून पुणे-मुंबईकडे 35 ते 40 बसेस ये-जा करतात यातील अनेक बस स्क्रॅपमधील असण्याची शक्यता आहे.त्याची तपासणी करण्यात येत आहे.परिवहन विभागाच्या वतीने कारवाई सातत्याने केली जाणार असून प्रवाशांनीही काही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन परिवहन विभाकडून करण्यात आलंय.
त्यामुळे आता प्रवाशांच्या जीवाशी बस चालकांकडून सुरु असलेला या हलगरजीपणावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातांच्या घटना कमी होणार आहेत.
What's Your Reaction?






