"साहेब, इकडे गोळीबार झालाय" म्हणत त्यांनी पोलिसांची गंमत केली ! मग पोलिसांनी त्याची गंमत केली

Feb 9, 2025 - 12:03
Feb 9, 2025 - 12:06
 0  1060
"साहेब, इकडे गोळीबार झालाय" म्हणत त्यांनी पोलिसांची गंमत केली ! मग पोलिसांनी त्याची गंमत केली

आय मिरर

शिर्डीत दुहेरी हत्याकांडचे प्रकरण ताजे असतानाच पोलीसांना गोळीबार झाल्याचा फेक कॉल करण तिघांना चांगलंच महागात पडलेय. पोलिसांची गंमत करून सरकार यंत्रणेला त्रास दिल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री तिन युवकांनी शिर्डी पोलिस स्टेशनच्या दुरध्वनीवर बुद्ध विहार येथे गोळीबार झाल्याचा कॉल केला.पोलीसांनी तत्काळ दखल घेत गोळीबाराचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केल्या.

मात्र घटनास्थळी तपास केला असता असा काहीच प्रकार घडले नसल्याचे दिसून आले. खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला तरी ही गोळीबारची कुठलीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कॉल करणा-या तीघांना शिर्डीतून ताब्यात घेतलय.

आदित्य नितीन शेजवळ, साई नागराजा नकला, स्वप्निल शामराव कुलकर्णी अशी तिघांची नावे असून खोडसाळ पणाने आणि गंमतीत पोलिसांना गोळीबार झाल्याचा फोन केल्याची कबुली तिघांनी दिल्याने शिर्डी पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow