भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन

Feb 9, 2025 - 12:57
 0  556
भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन

आय मिरर (निलेश मोरे)

मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण.मकर संक्रांती या सणापासून रथसप्तमी पर्यंत तिळगुळ वाटप व हळदी कुंकू समारंभ केले जातात.भिगवन गावातील महिलांसाठी येथील ग्रामपंचायतीने भैरवनाथ मंदिर येथे हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन केले होते. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहत सौभाग्याच लेणं असलेले हळदीकुंकू एकमेकींना लावत तिळगुळ वाटप केले व कार्यक्रमाचा आनंद घेतला.तसेच वाण म्हणून पाण्याच्या बादलीचे वाटप करण्यात आले.

बचत पाण्याची गरज काळाची,आता राबवू जलनीती,नको दुष्काळाची भिती,जर आपल्याकडे पाणी आहे तरच आपल्याकडे उद्या आहे,असे संदेश देत पाणी बचत करणेबाबत उपदेश देण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन मा.सरपंच दिपीका क्षीरसागर,मुमताज शेख,ऍड.तेजस्विनी भोसले, प्रतिमा देहाडे,स्वाती धवडे,स्मिता जाधव,नीलिमा बोगावत,तृप्ती जाधव,शीतल शिंदे,सोनल वायसे,विद्या पवार,सईबाई खडके यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नमाला रायसोनी,माया झोळ,प्रमिला जाधव,मंगल शिंदे,मेघा शेलार,सीमा काळंगे, मनीषा वाघ,अश्विनी बंडगर, शीतल जांभळे,डॉ.पूनम रेणूकर, डॉ.जयश्री गांधी,दिपाली भोंगळे,सपना शिंदे,कल्पना धवडे,वंदना कोंगे,मोनिका क्षीरसागर,रेखा पाचांगणे,विनिता कोंगे,छाया पाचांगणे,पूजा पाचांगणे,दिप्ती कोठारी,स्नेहा रायसोनी,नलिनी गोरे व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

"संक्रातीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे या वर्षीही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ हिंदू संस्कृतीमधील एक पारंपारिक सण आहे या संस्कृतीमध्ये हळदीकुंकूला विशेष महत्त्व आहे या समारंभाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातील महिला एकत्र येत असतात.व कार्यक्रमाचा आनंद घेत असतात." - दिपीका क्षीरसागर,मा.सरपंच भिगवण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow