कोलकाता घटनेच्या निषेधार्थ इंदापूरात डाॅक्टरांची शांतता रॅली

Aug 17, 2024 - 16:40
Aug 17, 2024 - 17:26
 0  273
कोलकाता घटनेच्या  निषेधार्थ इंदापूरात डाॅक्टरांची शांतता रॅली

आय मिरर

कोलकाता मधील घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या इंदापूरात आज शनिवारी 17 आँगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोशिएन कडून शांतता रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला. इंदापूरातील डाॅक्टरांनी एकत्र येत खडकपूरात येथून डाॅ.नितू मांडगे सभागृहापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.

डाॅ.राम अरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शांतता रॅली काढण्यात आली.यात इंदापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल शिर्के,उपाध्यक्ष डाॅ.रोहिदास थोरवे, उपाध्यक्ष डाॅ.शिवाजी खाबाले, सचिव डाॅ.सुधीर तांबिले,सह सचिव डाॅॅ.रोहित कांडलकर, डाॅ.संजिव हेगडे,डाॅ.सागर दोशी, डाॅ.अविनाश पाणबुडे, डाॅ.कमलाकर व्होरकाटे, डाॅ.समीर मुलाणी, डाॅ.पंकज गोरे,डाॅ.रियाज पठाण,डाॅ.विनोद राजपुरे, डाॅ.श्रेणिक शहा, डाॅ.उदय फडतरे,डाॅ.कल्पना खाडे,डाॅ.कोमल गार्डे,डाॅ.स्मिता शेळके,डाॅ.अनुजा दोशी,डाॅ.आरती फडतरे यांसह आयएमचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.

इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.अनिल शिर्के म्हणाले की,9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीची ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली.या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्यात बदल करण्याचा आग्रह आम्ही केंद्रशासनाकडे करत आहोत.

या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.आज आम्ही देखील शांतता रॅली काढत या घटनेचा निषेध नोंदवत आहोत.

या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

15 ऑगस्ट 2024 रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.

या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवस सेवा बंद संप केला आहे.यात केवळ अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यात.

इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन दर्शवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow