भवानीनगर मधून अज्ञात महिलांनी हात चालाखी करीत तीस हजारांचे दागिणे पळवले

Jun 21, 2024 - 19:09
Jun 21, 2024 - 19:30
 0  1038
भवानीनगर मधून अज्ञात महिलांनी हात चालाखी करीत तीस हजारांचे दागिणे पळवले

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर मध्ये अभिषेक ज्वेलर्स या सराफा दुकानातून अनोळखी सराईत महिला चोरट्यांनी हातचलाखी करून सुमारे 30 हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.याबाबत अभिषेक लक्ष्मण पाटोळकर रा. बारामती यांनी भवानीनगर पोलीस दूर क्षेत्रामध्ये फिर्याद दिली आहे.

बुधवारी (दि १९) ही घटना घडली असून अभिषेक पाटोळकर यांचे भवानीनगरमध्ये अभिषेक ज्वेलर्स या नावाने सराफी दुकान असून या दुकानांमध्ये बुधवारी दुपारी चार महिला चांदीचे पैंजण घेण्यासाठी आल्या होत्या दुकानातील कामगारांनी या महिलांसमोर पसंत करण्यासाठी अनेक प्रकारचे चांदीचे पैंजण ठेवले चार महिलांपैकी तीन महिला काउंटरच्या समोर उभ्या होत्या व एक महिला मधे असणाऱ्या महिलेच्या मागे उभा होती दोन मधे असलेल्या महिलेने प्लास्टिकच्या आवरणामध्ये असलेल्या चांदीच्या पैंजणाचा गठ्ठा पाहण्याच्या निमित्ताने हातामध्ये घेतला होता. या गठ्ठयातील सहा पैंजण मागे उभा असणाऱ्या महिलेने दुकानातील काउंटर वरील कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही हे पाहून घेतले व लपवले.

हे संपूर्ण दृश्य दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या चार महिलांनी ३३० ग्रॅम वजनाचे सहा चांदीचे पैंजण सुमारे ३० हजार ५२५ रुपयांचे चोरून नेले आहेत. याबाबत भवानीनगर पोलिसांनी या महिलांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी व्ही माणेर करीत आहेत.

अशा अनोळखी महिलांच्या बाबतीत सराफी व्यावसायिकांबरोबरच ग्रामस्थांनी देखील सावध राहावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow