बारामतीत पार पडली 'बारामती हाप मॅराथॉन' ऑलिंपिक पदक विजेता विजेंदरसिंह ची उपस्थिती

आय मिरर
शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे.गेल्या दोन वर्षापासून या हाफ मॅरेथॉनच आयोजन केलं जातं या वर्षी देखील हजारोंच्या संख्येने स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ऑलिंपिक पदक विजेते बॉक्सर विजेंदरसिंह,शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार, श्रीनिवास पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार उपस्थित होते.
2023 साली युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून शरयु फाऊंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत हाफ मॅरेथॉनची सुरवात करण्यात आली. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. रेल्वे स्टेशन समोरील एमईएस हायस्कूलच्या प्रांगणातून या मॅरेथॉनची सुरुवात झाली.
या स्पर्धेमध्ये यावेळी 21 किलोमीटर 10 किलोमीटर व तीन किलोमीटर तसेच फन रन व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी मॅरेथॉन असे गट पाडण्यात आले होते. साधारण सकाळी 6:00 वाजल्यापासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे.
What's Your Reaction?






