खडकवासल्यातून इंदापूरला मिळणार अर्धा टि.एम.सी पाणी ; आ.भरणेंसह कृती समितीच्या मागणीची अजितदादांनी घेतली दखल 

Jun 1, 2024 - 16:52
Jun 1, 2024 - 16:58
 0  510
खडकवासल्यातून इंदापूरला मिळणार अर्धा टि.एम.सी पाणी ; आ.भरणेंसह कृती समितीच्या मागणीची अजितदादांनी घेतली दखल 

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे-कळस-रूई-कौठळी-बिजवडी-तरंगवाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.खडकवासला कालव्यातून तात्काळ या परिसरात पिण्यासाठी पाणी सोडावे अशी कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात आली होती.आमदार भरणे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती.अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दखल घेत खडकवासला कालव्यातून इंदापूरला अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने काही अंशी प्रश्न मार्गी लागणार आहे.

या भागातील प्रताप पाटील,भाजपचे रमेश खारतोडे,बाळासाहेब भांडवलकर,कृती समितीचे अध्यक्ष विजय गावडे,विनोद पोंदकुले,तुषार गावडे,राहुल खारतोडे,स्वप्नील पाटील,विशाल खोमणे,नवनाथ सांगळे आदी शेतकऱ्यांनी एकत्र येत खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून कालच डाळज नं.२ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून दुष्काळाची परस्थिती पाहता लवकरात-लवकर खडकवासल्यातून अर्धा टि.एम.सी. पाणी मिळावे म्हणून पालकमंत्री अजित पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन या शिष्टमंडळाने विनंती केली होती.

त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून आमदार दत्तात्रय भरणे व खडकवासला कालवा पाणी संघर्ष समितीच्या मागणीची दखल घेऊन खडकवासल्यातून इंदापूर तालुक्यासाठी तात्काळ अर्धा टि.एम.सी.पाणी सोडण्यासंबंधीचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.त्यामुळे या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून काही अंशी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow