चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Feb 17, 2025 - 11:55
Feb 18, 2025 - 21:07
 0  759
चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आय मिरर

चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंदापूर मधून अटक केली आहे. चार वर्षापासून विविध गुन्ह्यात पुणे ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील निरवांगी गावातील दीपक पोपट रासकर यांच्या घरी 17 जानेवारी 2024 रोजी अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली होती.यात दीपक रासकर यांना या अज्ञात चोरट्याने चाकूने जखमी केले होते.या प्रकरणी वालचंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याच्या तपास प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस पथक तैनात केले होते.तपासात पोलिसांना घटनास्थळा पासून जाणारे येणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काही संशयित इसम निदर्शनास आले होते. सदर फुटेज मधील इसमांचे वर्णन व गुन्हा करणेसाठी आलेले आरोपींचे वर्णनात साम्य होते, त्याअनुषंगाने पथकाने प्राप्त फुटेज हे गोपनीय बातमीदारांना दाखविले असता, संशयित इसम हा रेकॉर्डवरील आरोपी हा इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर मधील शिवा मिठु भोसले असून त्यानेच त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या माहितीचे आधारे निष्पन्न आरोपी शिवा भोसले याचा स्था.गु.शा.चे पथकाने वारंवार जावून शोध घेतला असता, तो वेळोवेळी गुंगारा देत होता.

15 फेब्रुवारी 2025 रोजी वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत पो.हवा स्वप्निल अहीवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी शिवा भोसले हा सराफवाडील चौकात आलेला आहे, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शिवा मिठु भोसले यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने वरील नमुद गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करते वेळी त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले.

शिवा भोसले हा वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी आहे.तर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये ही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावर अभिलेखावर होता. पोलीस त्याच्या शोधात होते.

सदरची कार्मागरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पो स्टे चे स.पो.नि राजकुमार डुणगे, स्था.गु.शाचे स.पो.नि कुलदीप संकपाळ, स्था.गु. शा.चे अंमलदार बाळासाहेब कारंडे, ज्ञानदेव क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, अतुल डेरे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow