बिग ब्रेकिंग || इंदापूर तालुक्यातील हगारेवाडीत मायलेकी आढळल्या मृतावस्थेत

Oct 20, 2023 - 17:18
Oct 20, 2023 - 17:21
 0  6412
बिग ब्रेकिंग || इंदापूर तालुक्यातील हगारेवाडीत मायलेकी आढळल्या मृतावस्थेत

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी सागर म्हस्के वय २८ वर्ष व सानवी सागर म्हस्के वय ४ वर्षी अशी मृतांची नांवे असून आज दुपारी पावणे एक च्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगल ला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आल्या.या प्रकरणाचा अधिक तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.

दरम्यान वालचंदनगर पोलीस मृत महिलेच्या पतीला वालचंदनगर पोलीसांनी ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिला पोलीसांनी कशीबशी सोडवणूक करुन त्याला गाडीत घातले.

तेजश्री शेखर म्हस्के आणि मयत अश्विनी म्हस्के या सख्या बहिणी सख्या जावा आहेत. तेजश्री दुपारी शेतातून कामानिमित्त घरी आल्या यावेळी घराची खिडकी उघडी दिसली तेजश्री यांनी खिडकीतून पाहिले असता अश्विनी आणि सानवी या राहत्या घरातील पत्र्याच्या अँगल ला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे त्यांना दिसून आल्या.

यानंतर वालचंदनगर पोलीस ठाणयाचे सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली,विजय टिळकेकर, पो.हवा. विनोद पवार आणि प्रमोद तापसे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेहांचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे पाठवले आहेत. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow