देशाचे नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती हीच विकासाची गॅरंटी - अजित पवार
इंदापूर (देवा राखुंडे)
देशाचे नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती हीच विकासाची गॅरंटी असून केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असल्यावर विकासासाठी फायद्याचे ठरते.यामुळे देशात आणि राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी प्रयत्न करा.तुम्ही लोकसभेला भरभरून मताधिक्य द्या मी भरभरून निधी देतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवार (ता.25) रोजी आयोजित शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी बारामती टेक्स्टाईल कंपनीचे अध्यक्ष सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,अजित पवार यांचे पुत्र युवा नेते जय पवार,पूणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, सुरेश घुले, नितेश नाहटा, किरण गुजर, वैशाली नागवडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे यांचेसह मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, विकासासाठी आम्ही सत्तेत सामील झालो असलो तरी विचारधारा सोडलेली नाही.महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. बारामती इंदापूर पट्टा हे माझे होम ग्राउंड आहे. यंदा दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे परंतु शहरी भागावरही अन्याय होता कामा नये याकडे विशेष लक्ष आहे.
देशातील 65 टक्के जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते आणि आपल्या भागातून जर आमच्या विचाराचा खासदार दिला तर पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. वेगळी भूमिका घेत सत्तेत सहभागी होताना जनतेच्या पाठबळावर निर्णय घेतला असून कोठेही भावनिक होऊ नका असे असेही आवाहन पवार यांनी केले त्याचवेळी विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही चार दिशेला चौघांची तोंड आहेत. असाही टोला लगावला.तसेच चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे असतात आता सासूंचे दिवस गेले आहेत सुनांचे दिवस आले आहेत अर्थात योग्य मतदान केलं तरच असे आवर्जून सांगितले.
माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले,विकासाच्या बाबतीत बारामती नंतर इंदापूर शहराची ओळख व्हावी साठी गेली दहा - बारा वर्षात अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी तालुक्यासाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे इंदापूर शहरासह तालुक्याचा कायापालट झाला आहे याच प्रमाणे आगामी काळात उर्वरित विकास कामेही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू यामध्ये प्रामुख्याने टाटा धरण आणि निरा देवधर चे बचतीचे पाणी हे इंदापूरला द्यावं यासाठी पाठपुरावा करणार आहे.
पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले विकासाचा पोलादी पुरुष म्हणून ओळख असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामांच्या बाबतीत अजित पवार यांचे कौतुक करतात. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका राज्यपुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्र बलवान करण्यासाठी घेतली आहे. यामुळे लोकसभेला दादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी तर आभार सचिन सपकाळ यांनी मानले.
शिरसोडी ते कुगाव पूल उभारणार ...
इंदापूर तालुक्यातील व्यापार वाढीसाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा उजनी धरण पणीसाठ्यावर इंदापूर तालुक्यातील शिरसोड येथे करमाळा तालुक्यातील कुगाव पुलाची मागणी आ.भरणे यांनी केली यावर पवार यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या अर्थसंकल्पात या पुलासाठी निधी देऊ अशी घोषणा केली यावेळी उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या गजरात या गोष्टीचे स्वागत केले.
-
What's Your Reaction?