तरंगवाडीत एक लाख ३० हजारांचे जनावरांचे मांस जप्त चार जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर पोलिसांनी तरंगवाडीत रविवारी २५ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास एक लाख 31 हजार ४०० रुपये किमतीचे विना परवाना जनावरांचे ८०० किलो वजनाचे मांस कारवाई करत जप्त केले असून आरीफ यासीन कुरेशी, रा. जावायवाडी इंदापुर,एम.डी. युनुस रा.दर्गा मज्जीद इंदापुर, मोहसिन गुलामनबी सय्य्द,रा.कसाब गल्ली बारामती,अब्दुल रजाक रफिक कुरेशी रा.श्रीराम चौक इंदापूर, या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई रवींद्र राजेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी २५ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास तरंगवाडी( ता. इंदापुर) येथील
बारामती रोडचे दक्षिण बाजुला तलावातील झुडपाच्या आडोशाला मोकळ्या जागेत पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना न घेता या ठिकाणी गाई व बैल वासरे यांची कत्तल केल्याचे दिसून आले. बाजुला जनावरे कापणे साठी सिमेंटचा कोबा केलेला दिसला. रक्ताचे डाग दिसत होते.बाजुचे मोकळ्या जागेत गाई व बैल,वासरे कापुन त्यांची मुंडकी, पाय, धुड, कातडी काढलेल्या अवस्थेत त्यांना मास चिकटलेली हाडे दिसले.
अंदाजे ८२० किलो वजनाचे १६० रुपये प्रतिकिलो प्रमाणे १ लाख ३१ हजार ४०० रुपयाच्या मांसासह दोन लोखंडी कोयते, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?






