"मिशन विधानसभा" उद्या कुरवलीत हर्षवर्धन पाटलांचा जनता दरबार ! 

Jul 24, 2024 - 16:27
 0  439
"मिशन विधानसभा" उद्या कुरवलीत हर्षवर्धन पाटलांचा जनता दरबार ! 

आय मिरर

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उद्या गुरुवारी दि.२५ जुलै रोजी कुरवली येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

हर्षवर्धन पाटलांचा सकाळी 8 वाजलेपासून जनता दरबार आयोजित करण्यात आला असून आगामी विधानसभेच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांकडून "मिशन विधानसभा" राबवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हर्षवर्धन पाटील हे सध्या जिल्हा परिषद गटानुसार नागरिकांच्या भेटीला जनता दरबार मधून उपस्थित राहत असून त्यांचे प्रश्न समजून घेत जागेवर त्याचं कांडकं पाडत आहेत.यास पार्श्वभूमीवर ते गुरुवारी कुरवली येथे भेटीसाठी उपलब्ध असून जनतेची व कार्यकर्त्यांशी सुसंवाद सांधणार आहेत.             

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची सार्वजनिक कामे, विविध प्रश्न, अडी अडचणी जागेवर संबंधितांची संपर्क करून मार्गी लावत आहेत. त्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो, बावडा येथील रत्नाई निवासस्थानी तसेच दुधगंगा दूध संघामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या वेळोवेळी झालेल्या सुसंवाद कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त परिसर लाभला आहे. 

कुरवली येथे गुरुवारी होणाऱ्या सुसंवाद कार्यक्रमाचा लाभ जनतेने व कार्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय इंदापूर, यांचेकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow