इंदापूर तालुक्याच्या विकासाला कमिशनखोरी व भ्रष्टाचाराचे ग्रहण ; हर्षवर्धन पाटलांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका  

Mar 3, 2024 - 16:38
 0  706
इंदापूर तालुक्याच्या विकासाला कमिशनखोरी व भ्रष्टाचाराचे ग्रहण ; हर्षवर्धन पाटलांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका   

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे सध्या उजनी धरणांमध्ये केवळ वजा १६ टक्के पाणी साठा उरला आहे. सत्ताधाऱ्याच्या अज्ञानामुळे तालुक्यातील लाकडी निबोंडी उपसा जलसिंचन योजनेतील सिंचनाचे क्षेत्र सुमारे सहा हजार हेक्टरने घटले, मागील दहा वर्षांमध्ये तालुक्यामध्ये एकही शैक्षणिक संस्था मंजुर झाली नाही.त्यामुळे त्याचा रोजगारांवर विपरीत परिणाम झाला. विकासाच्या बाबतीत अग्रेसह असलेल्या इंदापुर तालुक्याची अकार्यक्षम नेतृत्वामुळे पिछेहाट झाली आहे.तर या तालुक्याला कमिशनखोरी व भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून याचा हिशोब विरोधकांना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी द्यावा लागेल असा हल्ला राज्याचे माजी सहकार व ससंदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

रविवारी ०३ मार्च रोजी भिगवण येथील दुर्गामाता मंदिरांमध्ये भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

या मेळाव्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, विलास वाघमोडे, प्रमिला जाधव, हनुमंत वाबळे, पराग जाधव, य़शवंत वाघ, अरविंद जगताप, गजानन जगताप, शामराव परकाळे, अशोक वणवे, संजय जगताप, तानाजी जगताप, संजय रायसोनी,संपत बंडगर, हनुमंत काजळे, रंगनाथ देवकाते, अशोक पांचागणे,अभिमन्यु खटके, तेजस देवकाते, रणजित भोंगळे, दिपाली क्षीरसागर, शिवाजी कन्हेरकर, मनिषा वाघ, माधुरी जगताप, नारायण बंडगर, अमर धवडे, विठ्ठल म्हस्के, बाळासाहेब पानसरे, राजेंद्र वाघ, तानाजी वायसे, सुरेश जगताप, जयदीप जाधव संदीप खुटाळे, उपस्थित होते. 

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, तालुक्यातील रस्त्याच्या विकास झाला असा दावा विरोधकांकडुन केला जात आहे. परंतु तालुक्यातील रस्त्यांचा विकास न होता अ ब क ड यांचाच विकास झाला आहे. भ्रष्टाचाराची ही अ ब क ड ची बाराखडी तालुक्यातील जनतेला चांगली समजली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुर जलजीवन मिशन अंतर्गत इंदापुर तालुक्यासाठी ८०० कोटी रुपये मंजुर करण्यात आहेत परंतु जलजीवन मिशनच्या कामालाही कमिशनखोरी व भ्रष्टाचाराचे ग्रहन लागले आहे. आगामी काळांमध्ये हा भ्रष्टाचार मुळासह उख़डुन टाकु असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापुर तालुक्यामध्ये फिरु देणार नाही अशी भाषा वापरण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे. ठेकेदारी व कमिशनच्या माध्यमातुन मिळालेल्या मलिदयातुन ही मुजोरी आली आहे. इंदापुर तालुक्याला कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सुसंस्कृत विचारांचा वारसा लाभलेला आहे. तालुक्यातील सुज्ञ जनता ही गुंडगिरी खपवुन घेणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातून ही गुंडगिरी व मुजोरी ठेचुन काढण्याची वेळ आली आहे.

यावेळी मारुती वणवे, प्रमिला जाधव, विलास वाघमोडे, अशोक शिंदे, बाबा महाराज खारतोडे, जावेद शेख, संतोष घोळवे, रामभाऊ वणवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. शरद जामदार यांनी केले, सुत्रसंचालन शाम सातर्ले यांनी केले तर आभार संजय देहाडे यांनी मानले.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow