31 मार्चपर्यंत थकित कर्ज भरा ! बारामतीच्या माळेगावात दादांची शेतकऱ्यांना तंबी

Mar 28, 2025 - 19:57
 0  398
31 मार्चपर्यंत थकित कर्ज भरा ! बारामतीच्या माळेगावात दादांची शेतकऱ्यांना तंबी

आय मिरर

मागच्या वेळेस काहींनी जाहीर नाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली आहे असं काही लोक मला म्हणत होते. पण आज 28 तारीख आहे महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो की 31 तारखेच्या आत जे काही कर्ज असेल ते आपापले पैसे भरा असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना तंबीच दिली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की,आज साडेसात एचपी पर्यंत तुम्हाला वीज माफी आहे पण तुमचे पैसे सरकार भरते. असं म्हणत अजित पवारांनी हिशोबच सांगितला आहे. परिस्थिती नुरूप पुढचे निर्णय घेऊ पण आता अशा प्रकारची परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षीचं पण आणि पुढच्या वर्षीच पण कर्जाचे पैसे भरा असं आवाहन त्यांनी केलं.

दूधवाल्यांना देखील दुधाचे अनुदान देखील बहुतेकांना जमा झाले असेल. चाळीस दिवसाची सात रुपयाप्रमाणे विशेष जमा झाले आहेत. जे जाहीर केले असेल त्या पद्धतीने दिले जाईल. मी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून 11 अर्थसंकल्प सादर केले.मला थोडीशी तरी अक्कल आहे राज्याचा अंतर्गत सादर करतो.मी सभागृहात उत्तर देताना सुद्धा सांगितलं की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही. 

माळेगाव सहकार साखर कारखान्याने पहिल्यांदा 28 रुपयाचा भाव दिला. तुम्ही जसा कुटुंबाचा विचार करता तस ही लोक माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातील सभासदांचा विचार करतात आम्ही जनतेच्या 13 कोटी जनतेचा विचार करतो.काही महत्वाचे निर्णय मी बजेटच्या निमित्ताने राज्याला सांगितले. देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला.विरोधकांनी टीका करायची ती केली तर त्यांचा अधिकार आहे.

माळेगाव कारखान्याची बदनामी केली जाते....

आज माळेगाव कारखान्याची बदनामी केली जाते.माळेगाव सहकारी साखर कारखाना अगोदरच्या काळात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता,हे काळया दगडावरची पांढरी आहे. हे मी नाकारत नाही.आज राज्यातील कारखान्यांची यादी माझ्याकडे आहे की आम्हाला ते एनसीडीसी मधून पैसे द्या अशी मागणी करीत आहेत. आमचे प्रस्ताव अमित शहांकडे पाठवा,आम्ही कारखाने चालवू शकत नाही असे ते म्हणतात.ही गोष्ट माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या बाबतीत नाही. 

मला पिडीसीसी बँकेत वेळ देता येत नाही म्हणून मी राजीनामा दिला आहे.मी बँकेच्या सीईओ ला सतत विचारत असतो काय अडचण आहे का काय चाललं आहे. त्याप्रमाणे माझ्या दोन्ही कारखान्याकडे लक्ष असते.

सहकार खात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, ज्या काही परवानगी असतील अडचणी असतील त्या जेवढे झटपट मी सोडवू शकतो तेवढे दुसरा कोणी सोडू शकत नाही.हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे आता फक्त शंभर दिवस झाले आहेत.आता जरी कोणी काही त्यांची त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत असेल तरी देखील त्या संदर्भात तुम्ही शांत डोक्याने विचार करा असं आवाहन त्यांनी केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow