समाधानकारक खातं नाही ! अजित पवारांचे खांदे समर्थक दत्तात्रय भरणे नाराज ? मात्र…

आय मिरर
महायुती सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेश दौरा करताहेत. निवडणुकीच्या काळात आलेला ताण तणाव कमी करण्यासाठी कुटुंबासोबत विरंगुळा म्हणून आमदार भरणे यांचा हा परदेश दौरा असल्याचं सांगण्यात आलेय.
मात्र खाते वाटपात समाधानकारक खाते मिळालं नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात आहेत.
दत्तात्रय भरणे सोमवारी रात्रीपर्यंत परत येतील आणि लागलीच ते पुढील कामकाज सुरु करतील.त्यांचा परदेश दौरा पूर्वनियोजित होता अशी माहिती मंत्री भरणे यांच्या खाजगी स्वीयसहाय्याकडून देण्यात आलीय.
महायुती सरकार मध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांकडे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी देण्यात आलीय.मात्र अद्याप पर्यंत भरणे यांनी पदभार स्विकारला नसल्याने उलटसुटल चर्चा रंगु लागल्या आहेत.
भरणे यांचा हा परदेश दौरा पूर्वनियोजित होता,त्यानुसार ते गुरुवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.त्यानंतर ते शुक्रवारी विमानाने परदेशात गेले आणि सोमवारी रात्री पर्यंत मुंबईत येतील अन् लागलीच पुढील कामकाज सुरु करतील असं माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
What's Your Reaction?






