मोठी बातमी | मलिदा गँगने मला नकोसे केलय - अजित पवार

Mar 28, 2025 - 21:13
Mar 28, 2025 - 21:17
 0  528
मोठी बातमी | मलिदा गँगने मला नकोसे केलय  - अजित पवार

आय मिरर

राज्याचे उपमुख्यमंत्री आज बारामतीच्या दौऱ्यावर होते यावेळी बारामतीच्या माळेगाव मध्ये शेतकरी मेळावा पार पडला या शेतकरी मेळाव्यात अजित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.

काहीजण म्हणाले अजित पवारांच्या ताब्यात इतर कारखाने आहेत म्हणून अजित पवारांनी माळेगाव कारखान्याला 2800 रुपयांच पेमेंट काढायला भाग पाडले, पण कर्जाचा बोजा डोक्यावर न चढता चांगला भाव कसा देखील असा आमचा प्रयत्न असतो.

माझ्यात जीवात जीव असेपर्यंत माळेगावला धक्का लागू देणार नाही, ज्या दिवशी मला होणार नाही त्या दिवशी जाहीर सभा घेऊन सांगेन ते आजपासून मला होणार नाही. असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता युगेंद्र पवारांना लक्ष केल.

तर बारामती तालुक्यात चालू असणाऱ्या विकास कामावरूनही अजित पवार संतापल्याच पाहायला मिळालं. या मलिदा गॅंग ने तर मला नकोसे केलं आहे..! असं म्हणत अजित पवारांनी थेट रोषच व्यक्त केला... एकतर पुढारपण करा नाहीतर कॉन्ट्रॅक्ट बघा. असं म्हणत दादांनी भर सभेत ठेकेदारांना आणि पुढाऱ्यांना झापले आहे.

मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी निवडून येतोय विकासात कुठे कमी पडलो जाब विचारा.100 दिवस सरकारला झाले आहेत अन् शंभर दिवसात बारामतीला 1000 कोटी रुपये विकासासाठी आणले आहेत.मी बाकीच्यांसारखं कुठं भेटायला गेलो की फोटो काढत नाही, नमस्कार करायचा आणि फोटो काढायचा. फोटो काढून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रशासनावर दरारा असायला लागतो. असे म्हणत अजितदादा आपल्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता थेट टीका केली आहे. 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow