इंदापुरातील ''त्या'' कॅफेंवरती इंदापूर पोलिसांची धाड ; काय म्हणाले सूर्यकांत कोकणे

Jun 21, 2024 - 19:39
Jun 21, 2024 - 19:44
 0  2511
इंदापुरातील ''त्या'' कॅफेंवरती इंदापूर पोलिसांची धाड ; काय म्हणाले सूर्यकांत कोकणे

आय मिरर

इंदापूर शहरातील शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकलाय.

कॅफेचा मालक व कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेय. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होतंय… ताब्यात घेतलेल्या कॅफेचालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले आहे.

इंदापूर शहरातील बस स्थानकाच्या जवळच नारायणदास रामदास हायस्कूल आणि त्याच्या बाजूला इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या उच्च शिक्षण संस्थांचा परिसर आहे.याच परिसरात काही कॅफे चालवले जात होते. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना या ठिकाणी अश्लिल चाळे चालतात याबाबत टीप मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी 21 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास या चालवल्या जाणाऱ्या कॅफेवरती धाड टाकली.

यावेळी पोलिसांना या कॅफेमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिसून आल्या.एकूण तीन कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काही शालेय विद्यार्थिनींना पोलिसांनी सूचना देऊन सोडल्याची माहिती आहे.तर काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी केली जातेय.

इंदापूर तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी शिक्षणाची परिपूर्ण दालने आहे. खेडूपाड्यातून आणि आसपासच्या तालुक्यातून या ठिकाणी शिक्षणासाठी मुले मुली येत असतात.मात्र अशा कॅफेमुळे मुले मुली भरकटताहेत. याचा परिणाम समाजावर होतो. मुलांनी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसण्यास चहा पिण्यास हरकत नाही,मात्र कॅफेच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या या टपऱ्यांमध्ये फालतूगिरी किंवा अश्लील गोष्टी करणे गैर आहे. याचा समाजावर परिणाम होत असल्यामुळे आम्ही शहरातील तीन कॅफे वरती कारवाई केली असून हे कॅफे परवानाधारक होते का याची चौकशी आम्ही करीत आहोत. या कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितला आहे.

एकूणच इंदापूर शहरातील या शिक्षण संस्थांच्या आसपासच्या परिसरात असे कॅफे चालवले जातात,याबद्दल मागील काही महिन्यांपासून तक्रारी येत होत्या.पोलिसांनी आज अचानक या कॅफेवरती धाडी टाकून केलेल्या कारवाईचं इंदापूर शहरातील नागरिकांमधून आणि पालक वर्गातून कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow