"शेवटचा पर्याय" भव्य महामोर्चास इंदापुरात मोठा प्रतिसाद

Jan 29, 2024 - 19:11
 0  106
"शेवटचा पर्याय" भव्य महामोर्चास इंदापुरात मोठा प्रतिसाद

आय मिरर(देवा राखुंडे)

भाजप सरकारच्या धोरणा विरोधात इंदापूर तहसिल कार्यालयार सर्व सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी, बेरोजगार, राजकीय संघटना, शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना तसेच विविध पक्ष एकत्रित येऊन शनिवारी दि.२७ जानेवारी रोजी "शेवटचा पर्याय" म्हणून भव्य महामोर्चा काढला याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.

या मोर्चात महाराष्ट्र शासनाने दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.४४/एसडी-६ अन्वये ६५,६३९ सरकारी शाळांची विक्री (खाजगीकरण) करण्याचा कट आखला असुन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. सरकारी शाळेत शिकणारे ५९ लाख विद्यार्थी व २ लाख ४२ हजार ५०९ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे भविष्य यामुळे उध्वस्त होणार आहे. महाराष्ट्रातील १२५० डी.एड. कॉलेज बंद करण्यात आली आहेत. (याचा परिणाम गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातील ३०% प्राथमिक शिक्षक कमी झाले आहेत, इंदापूर तालुक्यात १६०० पैकी ११०० प्राथमिक शिक्षक शिल्लक आहेत) नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पान नं. २२० वर सरकारने शिक्षणावरचा खर्च शुन्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महाराष्ट्रातील २४,०३७ शाळा, २ लाख ८६ हजार ४८ शिक्षक व कर्मचारी, १ कोटी २३ लाख विद्यार्थी यांचे भविष्य उद्धवस्त होणार आहे. त्याचबरोबर भारतातील ४० हजार महाविद्यालयांपैकी २५ हजार महाविद्यालय सन २०३० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ हजार महाविद्यालयांना स्वायत्त (खाजगी) करुन सर्व कॅटगिरीच्या विद्यार्थ्यांची फी ४०० पट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१७/प्र.क्र.९३/कामगार-८ अन्वये एम.पी.एस.सी. व्यतरिक्त सर्व नौकर भरती उदा. पोलिस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सर्व कार्यालयीन व क्लरीकल पदे ही ९ कंपन्यांच्या मार्फत ठेकेदारी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेऊन सर्व सरकारी नोकऱ्या नष्ट केल्या आहेत. शासन निर्णय क्र. एमआयएस ०४२१/प्र.क्र.११३/विशा-४ या गृह विभागाच्या निर्णयाने मुंबई (वसई, विरार येथे) ५०० पोलिसांची पदे ७ डिसेंबर २०२३ रोजी कंत्राटी पध्दतीने भरण्यात आली आहेत. (वरीलपैकी कोणत्याही निर्णयावर विधानसभा किंवा लोकसेभेत चर्चा घडवून आणलेली नाही. त्याचबरोबर कोणत्याही मुद्याची चर्चा कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टि.व्ही. चॅनेलवर होऊ नये याची खरबदारी शासक वर्गाने घेतली आहे त्यामुळे आरक्षणाच्या समर्थनार्थ जीवाची बाजी लावून लढणाऱ्या एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. व कुणबी मराठा यांना याची माहिती नाही).

शेतकऱ्यांना हमीभाव, वीजबील, कोणत्याही अटी व निकष न लावता कर्जमाफी अशी खोटे आश्वासने देऊन वारंवार फसवणूक केली व त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व करत आहेत. ४) सन २०११ ला भारतातील सर्व पक्षांच्या सहमतीने ओबीसी जातिनिहाय जणगणना करण्याचा ठराव लोकसभेत मंजूर करण्यात आला परंतु सन २०१४ ला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करुन जातिनिहाय जणगणना करणार नाही असे सांगून १४० कोटी जनतेचा विश्वासघात केला.

फौजदारी कायद्यामध्ये बदल करुन पोलिसांना आरोपीची ६० ते ९० दिवस पोलिस कोठडी देण्याची तरतुद असेल व हिट अँण्ड रन मध्ये भारतातील लाखो वाहन चालकांना (ड्रायव्हर) दंड व १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा असेल या कायद्याच्या तरतुदीने दहशतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे.

आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचा वापर राजकीय नेत्यांनी त्यांच्या सभांना गर्दी करण्यासाठी करुन त्यांचे वेतनाचे प्रश्न प्रलंबित ठेवून त्यांची घोर फसवणूक केली आहे व आता प्रचंड दबाव आणून त्यांचे न्याय आंदोलन मोडीत काढले जात आहे.

आजच्या महागाईने गृहिणींना घर खर्च भागवणे कठीण झाले असून सर्वसामान्य लोकांना एकाच वस्तूसाठी अनेकवेळा टॅक्स द्यावा लागत आहे.

दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी सुब्रमन्यम स्वामी विरुद्ध निवडणूक आयोग या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केवळ ई. व्ही. एम. वरती मुक्त, निःपक्ष व पारदर्शक निवडणूका होऊ शकत नाहीत असे सांगितले होते. ई. व्ही. एम. मशिनच्या माध्यमातून मतांची चोरी केली जात आहेत. त्यामुळेच उपरोक्त गंभीर व भयंकर समस्या निर्माण झाल्या आहेत.अशा विविध विषयांवर वक्त्यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकार व राज्य सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड.इनायतअल्ली काझी, भिमाई आश्रम शाळा अध्यक्षा शकुंतला मखरे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा रेश्मा शेख, राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे,तेजपृथ्वी ग्रुप च्या अनिता खरात, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष समद सय्यद, वडार पँथर संघटनेचे अनिल पवार, हनुमंत कांबळे, संजय शिंदे, तानाजी धोत्रे, नानासाहेब चव्हाण, शिक्षक संघटनेचे संतोष हेगडे, सुहास मोरे, मंगेश शेंडे, शिवसेनेचे दादा देवकर, माळी महासंघाचे विकास शिंदे, महावीर वजाळे, बाबासाहेब भोंग, वकील संघटनेचे ॲड.सूरज मखरे, ॲड.आण्णासाहेब कडवळे, ॲड.सुमित वाघमारे, काँग्रेसचे चमनभाई बागवान, झाकीर काझी, बाळासाहेब धाईंजे, काकासाहेब जाधव, वसीम शेख, सूरज धाइंजे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व हजारोच्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow