भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ.भरणेंच्या हस्ते शुभारंभ

Mar 4, 2024 - 10:17
 0  234
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ.भरणेंच्या हस्ते शुभारंभ

आय मिरर(देवा राखुंडे)

सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेल्या वळसंग गावातील विहिर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  

दलित बांधवांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वळसंग गावातील या विहिरीचे स्वतः खोदकाम केले होते. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतरच या विहिरीचे पाणी प्यायचे असा निर्धार देखील त्यांनी केला होता. या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २४ एप्रिल १९३७ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले होते. अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार भरणे यांनी केले.

यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी गट नेते संयोजक आनंद चंदनशिवे, जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष पवार,जुबेर बागवान, माजी नगरसेवक गणेश पुजारी, जिल्हापरिषद कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, द. सोलापूर उपाभियंता उषा बिडला, शाखा अभियंता राजेश जगताप, कनिस्ट अभियंता सज्जन भडकवाड, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच श्री. कुरेशी, रवी कोळेकर, सह संयोजक अनुसीचीत जाती जिल्हा सरचिटणीस बलवान गोतसुर्वे, सिद्धराम वाघमारे,शांतिकुमार गायकवाड,अक्षय गायकवाड, रवी गायकवाड, दीपक गायकवाड,अशोक गायकवाड यांच्यासह प्रभागातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व भीम अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow