"ब्रम्हदेव आला तरी आमदार त्यांच्यासोबत राहणार नाहीत" रोहित पवार काय म्हणाले
आय मिरर
माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो त्या खासदार झाल्या आहेत.अजित पवारांनी भाषण केले मला नौटंकी म्हणतात.त्यांच्याच पक्षातील लोक आम्हाला फोन करतात आणि सांगतात. त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या पक्षतील लोक अस्वस्थ आहेत.त्यांचे सोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी त्यांच्यासोबत राहणार नाहीत,म्हणून त्यांनी सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली त्यांचे अभिनंदन करतो.अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांनी आधी सांगितले होत की राज्यमंत्री पद आम्हाला शोभणारे नाही,काकींना राज्यमंत्री पद दिले तर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल.त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे अजित पवारांना माहिती आहे.म्हणून त्यांनी काकींना खासदारकी दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर ते म्हणाले की कोर्टात जर आरक्षण टिकवण्याचे असेल सगळ्यांनी एकत्र यावे लागेल.घटना दुरुस्ती करावे लागेल.देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ते सदावर्ते यांनी मराठा समाजाला विरोध करीत आहेत ओबीसी समाजाला देखील विरोध केला.
पाटील पवार सुप्त संघर्ष.…
जयंत पाटील आणि माझ्यात वाद कुठं आहे? मीडिया ने वेगळा अर्थ काढला.आमच्यात वाद नाहीच,आम्हाला आमच्या जागा वाढवायच्या आहेत.असं स्पष्टीकरण ही रोहित पवारांनी देत सुरु असलेल्या विविध चर्चांना विराम दिला.
तर मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असावी म्हणून त्यांनी घरात उमेदवारी दिली.शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजित दादांनी विकास केला.पण कुठेतरी अजितदादांमध्ये निघोसेट असेल की घरामध्ये अजून एखादं पद असावं.उद्या आपले आमदार आणि नेते जे आपल्याबरोबर आज आहेत.ते दादांबरोबर ते बरोबर राहतीलच असं नाही. मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते केलं असावं असं ही रोहित पवार म्हणाले.
बारामतीचा दादा बदलायचाय…
युगेंद्र बाबत कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे अंतिम निर्णय साहेब घेतील.शेवटी ते कार्यकर्ते आहेत भावनिकेत त्यातले अनेक लोक युवा आहेत प्रेमाने मागणीच्या भरामध्ये काही मान्य त्या ठिकाणी केला जातात काही वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात पण शेवटी इथले निर्णय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत चालत आलेले आहेत.
What's Your Reaction?