मामा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी कधीही विसरणार नाही म्हणत इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आ.भरणेंना भरवला पेढा

Mar 4, 2024 - 10:50
 0  1610
मामा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी कधीही विसरणार नाही म्हणत इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आ.भरणेंना भरवला पेढा

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर कायम करण्याचा प्रश्न, मागील २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता. यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर या ६४ कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी अद्यादेश काढला आहे. यानंतर या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी आमदार भरणे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरपरिषद कर्मचारी सुरेश सोनवणे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून आमचा कामगारांचा प्रश्न प्रलंबित होता, आदरणीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी तो प्रश्न सुलभतेने आणि चांगल्या पद्धतीने सोडवला आहे. त्याबद्दल नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. या सोबतच आम्ही कर्मचारी तुम्हाला कायमस्वरूपी कधीही विसरणार नाही म्हणत या कर्मचाऱ्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना आनंदाचा पेढा भरवला. यावेळी नगरपरिषद मधील कर्मचारी महिला देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील भरणे यांना पेढा भरवला. मला साखर आहे तरीदेखील मी पेढा खातो असं म्हणत आमदार भरणे ही यावेळी या कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले.

यावेळी भरणे म्हणाले की, हे काम मी एकट्यानेच केले नाही इंदापूर शहरातील दोघांनीही यामध्ये सहकार्य केलं चांगला ठराव दिला त्याचा आपल्याला फायदा झाला. इंदापूर शहरातील स्थानिक पदाधिकारी लोकांनीही यामध्ये सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,भरत शहा,आज माजी नगरसेवक यांचे मोठे सहकार्य झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांबरोबर दोन-तीन बैठका झाल्या होत्या, परंतु निर्णय होण्यास काही सकाळ गेला यादरम्यान काही लोक हयात असतील नसतील मात्र जो काही फरक आहे तो त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे.

शासनाकडून तुमची कायमस्वरूपी नियुक्ती झाली यात मी तुमच्यावर उपकार केले नाहीत मी माझं कर्तव्य पार पाडले आहे. गरीब माणसाचं काम हीच ईश्वर सेवा आहे त्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. तुमचा जो निर्णय झाला त्याचा सर्वाधिक आनंद मला झाला. तुमचा सक्का मामा जसा तुमच्या सोबत आहे तसा हा मामा सर्वांच्या सोबत राहील अशी ग्वाही ही यावेळी भरणे यांनी दिली.

आजपर्यंत तुमच्या आर्थिक अडचणी झाल्या त्यावर मात करावी लागली. परंतु अडचणीतूनच मार्ग सापडतो आता प्रश्न सुटला आहे,आपली मुलं बाळ चांगली शिकवा. शहरातील लोकांना जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी करा चांगली सेवा करा आणि तुम्ही ते कराल असा आशावाद भरणे यांनी व्यक्त केला.

इंदापूर नगर परिषदेला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर…

इंदापूर नगर परिषदेला रस्त्यासाठी 90 कोटी आणि गटार योजनेसाठी 60 कोटी असा 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आणखीही विकास केला जाईल बाजार कट्टा आणि चांगला बगीचा इंदापूर शहरात निर्माण करायचा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow