आज निरनिमगाव,सुरवड मध्ये हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते विकास कामांची होणार उद्घाटन भूमिपूजने,गंगावळण मधील टीकेला देणार उत्तर?

आय मिरर(देवा राखुंडे)
निरनिमगाव व सुरवड येथे ग्रामपंचायतींच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते आज शुक्रवारी (दि.23) संपन्न होणार आहेत.निरनिमगाव येथे 4 वा. तर सुरवड येथे 5.30 वा. हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील हे विरोधकांच्या गंगावळण मधील केलेल्या टीकेला खास शैलीत उत्तर देण्याची शक्यता आहे.
गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी रात्री इंदापूर तालुक्यातील गंगावळण मध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये विरोधकांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.याच टीकेचा खरपूस समाचार हर्षवर्धन पाटील सुरवड आणि निरनिमगांव मधील कार्यक्रमात घेण्याची शक्यता वर्तवली जात असून हर्षवर्धन पाटील यांच्या या कार्यक्रमाकडे सर्वांची नजर लागली आहे.
नीरनिमगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, आंगणवाडी केंद्र इमारत उद्घाटन आदि कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार हे असणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच व निरा भिमा कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील व ग्रामस्थांनी केले आहे.
तर सुरवड येथे ग्रामपंचायत कार्यालय व व्यापारी गाळे यांचा उद्घाटन समारंभ हर्षवर्धन पाटील यांचे संपन्न होणार आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासबापू वाघमोडे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच योगिता शिंदे व उपसरपंच गीता कोरटकर, ग्रामपंचायत सदस्य व सुरवड ग्रामस्थांनी केले आहे.
What's Your Reaction?






