खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडा - आ.दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी...
आय मिरर
इंदापूर तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवतेय.याची दखल घेत खडकवासला कॅनाल मधून इंदापूर साठी पाणी सोडावे अशी अग्रणी मागणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे केलीय.
पाण्या अभावी हाता तोंडाशी आलेली विविध पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.यासाठी खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी सोडावे अशी मागणी शेतक-यांतून होतेय.
आमदार भरणे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडचेच दुष्काळ जाणवत आहे. इंदापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असुन अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक भागातील उन्हाळी पिके जळून गेली आहेत.तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे.
यामध्ये विशेषतः शेटफळगढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी,वायसेवाडी, कळस,पिलेवाडी,गोसावीवाडी, रूई,थोरातवाडी, मराडेवाडी,बोराटवाडी,कौठळी,बळपुडी,खामगळवाडी,बिजवडी,पोंदकुलवाडी,तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असुन सध्या या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत.त्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकवासल्यातुन इंदापुरसाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांना केली असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
What's Your Reaction?