इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारणीचा सोनाई परिवाराकडून सन्मान

Aug 17, 2024 - 17:48
Aug 18, 2024 - 18:19
 0  189
इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारणीचा सोनाई परिवाराकडून सन्मान

आय मिरर

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना 2024-25 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून या नूतन कार्यकारिणीचा सोनाई सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या हस्ते सन्मान शनिवारी 17 जुलै रोजी पार पडला.

अध्यक्षपदी निवड झालेले अँड.गिरीश शहा, उपाध्यक्ष अँड.भारत कडाळे व अँड.शरद घोगरे, सचिव अँड.योगेश देवकर, खजिनदार अँड.सोमनाथ फुलसुंदर, ग्रंथपाल अँड.भालचंद्र कुलकर्णी, महिला प्रतिनिधी अँड. तेजस्वी वीर, सदस्य अँड. आप्पासाहेब शिंदे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्षपदी निवड झालेले अँड. माधवराव शितोळे देशमुख, वनसंरक्षक पुरस्कार विजेते अँड.सचिन राऊत यांना ही यावेळी सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, कार्यध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष सागर मिसाळ, जेष्ट विधिज्ञ अँड.कृष्णाजी यादव, अँड. मनोहर चौधरी व इंदापूर बार असोसिएशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow