त्यांनी इमोशनल बनवून मामांनाच बनवलं मामा असे फसले इंदापूरचे आमदार दत्ता भरणे

Jun 15, 2024 - 21:17
Jun 15, 2024 - 21:24
 0  2014
त्यांनी इमोशनल बनवून मामांनाच बनवलं मामा असे फसले इंदापूरचे आमदार दत्ता भरणे

आय मिरर

इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना फोनवरून अज्ञातांनी इमोशनल करीत 15 हजारांना गंडा घातलाय याचा किस्सा आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात सांगितलाय.

सध्या चोऱ्या माऱ्यात वाढत आहेत मात्र इमोशनल ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण वाढला आहे याकडेही पोलिसांनी लक्ष द्यावं असे सांगत स्वतः आपण कसे फसले गेलो आहोत याचा किस्सा आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितलाय. 

मागील आठ दिवसापूर्वी मला एक फोन आला. फोनवरून आमचा अपघात झाला आहे.आम्ही इंदापूर तालुक्यातील आहोत. गाडीतील दोन इसम जागीच ठार झाले असून आम्ही देखील जखमी चालू आहोत आम्हाला उपचारासाठी तातडीने पैसे पाठवा अशी समोरून मागणी झाली. मी भावनिक झालो तात्काळ त्यांना पंधरा हजार रुपयाची ऑनलाईन मदत केली मात्र इंदापूर तालुक्यात चौकशी केली असता असं काही घडलंच नसल्याचा समजलं आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं असं भरणे यांनी म्हटलंय.

मी फसलो आहे हे मी बाहेर कोणाला सांगितले नाही मात्र आणखी एका आमदाराला देखील अशाच प्रकारे फसवलं गेलं असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी यापासून आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितलेय.. ही एक फसवणारी पालघर येथील टोळी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow