मदनवाडीच्या तेजस देवकातेंची भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी निवड
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील तेजस एकनाथ देवकाते यांची पुणे जिल्हा भाजपच्या चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. तेजस देवकाते हे भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. सध्या ते मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा कार्यरत असून यापूर्वी त्यांनी मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे. मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वात देवकाते यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळालेली आहे. त्यांच्या या निवडीनंतर नातेवाईक मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभावीपणे काम केलेले असून निर्मल वारी अभियान, विविध आंदोलने,मन की बात, परीक्षा पे चर्चा,हर घर तिरंगा अभियान, तिरंगा रॅली,रक्तदान शिबिरे असे एक ना अनेक उपक्रम सक्षमपणे राबवून म पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
कुस्ती स्पर्धा ,दहीहंडी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.तालुक्यातील प्रभावी युवा कार्यकर्ता, उत्तम संघटन कौशल्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी असलेला थेट जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होणार असल्याचे राजकिय जाणकारांचे मत आहे.
पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन भाजपसोबत युवकांची मजबूत फळी उभी करण्याचा निर्धार केला असून युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून फादर बॉडी मध्ये नियुक्ती मिळालेली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी तसेच आता जिल्हा सचिवपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. - तेजस देवकाते, सचिव, भाजप पुणे जिल्हा
What's Your Reaction?