फक्त पाच मिनिटं वादळ आलं कांदलगावात तोंडल्याच्या शेतीचा मांडवा आडवा झाला

Jun 15, 2024 - 09:39
 0  1149
फक्त पाच मिनिटं वादळ आलं कांदलगावात तोंडल्याच्या शेतीचा मांडवा आडवा झाला

आय मिरर

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या कांदलगाव मध्ये पाच मिनिटांसाठी आलेल्या सोसाट्याच्या वादळाने तोंडल्याच्या शेतीचा मांडव जमिनीवर आडवा झालाय. यात पांडुरंग फाटे यांचं लाखोंचं नुकसान झालंय.शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी फाटे यांनी केलीय.

पांडुरंग फाटे यांनी कांदलगांव मधील त्यांच्या पाऊण एकर जमिनीत अलिबाग जातीच्या तोंडल्याची शेती केली होती. यासाठी जून २०२३ मध्ये जी त्यांनी आपल्या शेतात आय तारांच्या माध्यमातून लाकडी खांबांचा आधार मांडव तयार केला होता. आणि २५ रुपये प्रति प्रमाणे ७५० रोपे नर्सरीतून आणून लागवड केली होती.आत्तापर्यंत तीन लाख रुपये खर्च झाला होता.

मागील पाच महिन्यापासून तोंडल्याचे उत्पादन सुरु झाले होते.प्रति दिवसाला २०० ते ३०० किलो पर्यंत सध्या उत्पादन मिळत होते. वाशी च्या बाजारात त्याला सरासरी २५ रुपये प्रति किलो बाजार भाव मिळत होता. 

तोंडल्याची शेती एकदा लावली आणि चांगली सांभाळली तर ती किमान पाच ते सात वर्षे टिकते.मला पुढील काही वर्षे यातून उत्पादन मिळणार होते. झालेला खर्च नक्कीच निघाला असता आणि मला नफाही झाला असता मात्र शुक्रवारी दि.14 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फक्त पाच मिनिटे सोसाट्याचं वादळ आलं अन् आख्खा फड जमिनिवर आडवा करुन गेलं.यामुळे माझं नुकसान झाल्याचं पांडुरंग फाटे यांनी सांगितले आहे.

आता लोळलेला मांडव पुन्हा उभा करण्यासाठी हजारोंचा खर्च असून पुढील उत्पादन चालु होण्यासाठी किमान तीन महिने जाणार आहेत.शासनाने पंचनामे करुन आम्हाला त्वरीत मदत करावी अशी अपेक्षा फाटे यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow