दौंड चे माजी आमदार रमेश थोरात खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला

Oct 22, 2024 - 17:40
Oct 22, 2024 - 17:43
 0  119
दौंड चे माजी आमदार रमेश थोरात खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला

आय मिरर

दौंड चे माजी आमदार रमेश थोरात बारामतीच्या गोविंद बागेत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. रमेश थोरात हे बारामतीत दाखल झाले आहेत आणि गेल्या महिन्याभरापासून रमेश थोरात हे तुतारी हाती घेणार अशा चर्चा सुरू आहेत.आजच्या या बैठकीत रमेश थोरात तुतारी हाती घेणार का हे पाहावं लागणार आहे.

रमेश थोरात हे अजित पवार गटाचे नेते असून ते दौंड चे माजी आमदार आहेत मात्र महायुतीच्या जागा वाटपात दौंड ची जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे.राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे रमेश थोरात यांची गोची झाली आहे.

एक तर तुतारी अन्यथा अपक्ष अशा स्थितीत सध्या रमेश थोरात आहेत आणि त्यामुळे रमेश थोरात यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow