भिगवण ग्रामपंचायत कडून अपंग कल्याण निधीचे वाटप

आय मिरर (निलेश मोरे)
भिगवण ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध,अपंग,दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे.
एकूण जवळपास १ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हा निधी वाटप करण्यासाठी विलंब करत असल्याने येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु तत्पूर्वीच ग्रामपंचायतने या निधीचे वाटप केल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना देखील यश आले आहे.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी नोंदणी केलेल्या अपंग लाभार्थ्यांची माहिती सांगितली.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असतो.
या निधी वाटप कार्यक्रमाप्रसंगी सरपंच गुराप्पा पवार,उपसरपंच सत्यवान भोसले,मा.सरपंच दिपीका क्षीरसागर,संजय देहाडे, प्रा.तुषार क्षीरसागर,आप्पासाहेब गायकवाड ,पराग जाधव,रमेश धवडे,जावेद शेख,दत्ता धवडे, ऍड.सुरज खटके,पिंटू शेलार, आकाश उंडाळे, विशाल पाचांगणे,कपिल लांडगे,तानाजी वायसे,आबा काळे,निलेश मोरे,आण्णा काटे,लाभार्थी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?






