उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इंदापूरचे आ. भरणे दाखल करणार आज उमेदवारी

Oct 25, 2024 - 06:54
Oct 25, 2024 - 06:55
 0  327
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इंदापूरचे आ. भरणे दाखल करणार आज उमेदवारी

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. आज दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दुपारी 2 वाजता दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

इंदापूर शहरातून दत्तात्रय भरणे पदयात्रा काढणार असून यानंतर इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

2009 साली दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदा इंदापूरची विधानसभा अपक्ष लढवली या त्यांचा पराभव झाला मात्र 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केलं गेल्या दहा वर्षापासून दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे नेतृत्व करत आहेत आणि आता चौथ्यांदा दत्तात्रय भरणे हे आपलं नशीब आजमावत आहेत.त्यामुळे दत्तात्रय भरणे विजयाची हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow