मलिदा गॅंग काम करायला गेली होती का ? आप्पासाहेब जगदाळेंचा अजित पवार गटावर निशाणा 

Aug 30, 2024 - 22:30
 0  203
मलिदा गॅंग काम करायला गेली होती का ? आप्पासाहेब जगदाळेंचा अजित पवार गटावर निशाणा 

आय मिरर

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी इंदापूर नगर परिषदेच्या समोर गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पुतळ्याचे काम करताना कामाची गुणवत्ता राखण्यात आली नाही, आठ महिन्यानंतर हा पुतळा कोसळला ही निंदनीय बाब महाराष्ट्राच्या इतिहासात घडली. तंत्रज्ञान असताना देखील हा पुतळा कोसळतो याचा अर्थ पुढील दोन-तीन महिन्यात हे सरकार सुद्धा पडणार आहे, आपल्या जिल्ह्यातून काही मलिदा गॅंग तिकडे गेली आहे का अशी टीका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवार गटावरती केली आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, ही बाब महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शरमेने मान खाली घालवणारे आहे. पुतळा विटंबना प्रकरणी संबंधित आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत.पुतळा विटंबना प्रकरणी संबंधित आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत.

यावेळी तालुकाध्यक्ष ऍड .तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शकील सय्यद,समद सय्यद, ऍड.आशुतोष भोसले ,सागर मिसाळ, आर्षद सय्यद, सुनील तळेकर,रेश्मा शेख यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow