मोठी बातमी | आणखी एक भावी मुख्यमंत्री ! वाचा सविस्तर
आय मिरर
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले आहेत.बारामती शहरातील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुप च्या वतीने अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपूर्वीच बारामती शहरात गणेश उत्सवात शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावला होता. आता यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असून यातून अजित पवारांना खुन्नस देण्यात आल्याची ही चर्चा आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमिवर बारामती शहरात ही बॅनरबाजी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आलं आहे. केवळ खा.सुळे यांचाच फ्लेक्स लावण्यात आला नाहीत सुळे यांच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा ही बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि हे दोन्ही बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
युगेंद्र पवार यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर छापण्यात आला असून फिक्स आमदार असं या बॅनरवर लिहण्यात आलेय. या बॅनरबाजीतून एकप्रकारे अजित पवारांना आव्हाण देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
मला महाराष्ट्राचे सरकार बदलायचं आहे असा निर्धार देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महायुतीला आव्हान दिले आहे.राज्याच्या विधानसभा अगदीच दीड दोन महिन्यात पार पडतील आणि लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनता पुन्हा एकदा पवारांना साथ देते की महायुतीला कौल देते हे लवकरचं स्पष्ट होईल.जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे नेतृत्व करावं अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून असून त्याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? याबाबत शिक्कामोर्तब झालं नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच चेहरा मुख्यमंत्रीपदी बसेल असा दावा केला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात असाही अंदाज लावला जातोय.
तर काका विरुद्ध पुतण्या होऊ शकते लढत
बारामती विधानसभेतून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल असं सध्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरतील आणि थेट अजित पवारांना आव्हान देतील त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल.
गेल्या काही दिवसापासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतंय.बारामती लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांचा घराघरापर्यंत प्रचार केला. युवकांची फळी उभा करत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयात योगदान दिले.तेव्हापासून तरुणांमधून आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी पुढे आली. सध्या बारामतीत युगेंद्र पवारांचं वारं वाहू लागलं आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडल्यानंतर युगेंद्र पवारांनी बारामतीत स्वाभिमानी यात्रा काढलीय. आगामी विधानसभेला लक्ष करीत ते बारामती तालुका पिंजून काढताहेत.युगेंद्र पवारचं बारामतीत पवार गटाचे संभाव्य उमेदवार असतील असे संकेत खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याने त्यांची उमेदवारी नक्की मानली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर बारामती मध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?