28 फेब्रुवारी पर्यंत खडकवासला कालव्यातून पाणी सोडा अन्यथा रास्ता रोको करू ! कौठळीतील शेतकऱ्यांचा जलसंपदा विभागाला इशारा

Feb 16, 2024 - 17:57
 0  434
28 फेब्रुवारी पर्यंत खडकवासला कालव्यातून पाणी सोडा अन्यथा रास्ता रोको करू ! कौठळीतील शेतकऱ्यांचा जलसंपदा विभागाला इशारा

आय मिरर(देवा राखुंडे)

खडकवासला कालव्यातून शेती करीता पाण्याचे आवर्तन. तात्काळ सोडण्यात यावे यासोबत कालव्याचे कॅनॉलचे बाजूस असणारी काटेरी झुडपे काढण्यात यावी या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील कौठळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी, इंदापूर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी हलगीनाद आंदोलन करीत 28 फेब्रुवारी पर्यंत कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन न सुटल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.या संदर्भातील लेखी निवेदन उपविभागीय अभियंता खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूर शंकर मारुती बनकर यांना दिले आहे.

खडकवासल्याचे पाणी दोन महिण्या पुर्वी आले होते. त्याचा कोणत्याही शेतक-याला लाभ झाला नाही व खडकवासला धरणाचे पाणी सतत दौंड ला चालु आहे. त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. व पिके जळुन चालली आहेत. त्यामुळे २८ फेब्रुवारी पर्यंत टेल टू हेड पध्दतीने पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow