डिकसळ पुलाची आतुरता संपली ! कोंढार चिंचोली ते डिकसळ नवीन पुलाचा कार्यारंभ आदेश झाला

Aug 30, 2023 - 18:14
Aug 30, 2023 - 21:02
 0  2058
डिकसळ पुलाची आतुरता संपली ! कोंढार चिंचोली ते डिकसळ नवीन पुलाचा कार्यारंभ आदेश झाला

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

करमाळा व इंदापूर तालुका ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे ती कोंढार चिंचोली ते डिकसळ नवीन पुलाचे काम कधी चालू होणार ती प्रतीक्षा एकदाची संपली आहे.

या कामाचा सतत पाठपुरावा करणारे कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ते देविदास सांळुखे यांनी वेळोवेळी शासन दरबारी, मा.कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून कार्यरंभ आदेश काढणे कामी सतत प्रयत्न करून कार्यारंभ आदेश दि 21/8/2023 च्या पत्राने मिळाला असून सदर कामाचे ठेकेदार विजय पटेल शिरपूर धुळे यांची कामाचे संदर्भातील पोकलेन मशीन पुलाचे साईड वर हजर झाली आहे कामाचे ठेकेदार काम चालू करणेस हजर झाले असून काम हे चालू होत असून या भागातील सर्व लोक आनंदी असलेचे दिसून येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow