धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरडेवाडी टोलवर रास्ता रोको इंदापूर शहरात ही पाळला बंद
आय मिरर
राज्य सरकाने धनगर एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी इंदापूर जवळील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय.यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
याच सोबत बारामती प्रशासकीय भावना समोर सुरू असणाऱ्या चंद्रकांत वाघमोडे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी आज शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवत या बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिलाय.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाटोळे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त बजावण्यात आला होता तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर कळवण्याच्या आश्वासन दिले यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
What's Your Reaction?