गलांडवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंग जावळे यांचे निधन,हर्षवर्धन पाटलांकडून जावळे कुटुंबाचे सांत्वन
आय मिरर
गलांडवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंग जावळे यांचे दि. 18 नोव्हेंबर रोजी निधन झाले ते 74 वर्षांचे होते.गलांडवाडी ग्रामपंचायतची स्थापना झाल्यानंतर 1984 मध्ये पहिले सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
त्यांच्या कार्यकाळात गावामध्ये वीजपुरवठा,पाणीपुरवठा, रस्ते इत्यादी मार्गी लागली होती, गावामध्ये तरुण मंडळाची स्थापना एक गाव एक गणपती व संपूर्ण दारूबंदी या कामांमध्ये त्यांचा सहभाग होता.त्यांनी इंदापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणूनही काम पाहिले होते. ते उजनी परिसरामध्ये कै. शंकरराव पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित होते.
त्यांचे पश्चात पत्नी व पै. बाळासाहेब जावळे व माजी पणन अधिकारी यशवंत जावळे ही दोन मुले व पाच नातवंडे असा परिवार आहे. ही घटना समजताच भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जावळे कुटुंबाची नुकतीच भेट घेऊन जावळे कुटुंबाचे सांत्वन केले.
What's Your Reaction?