ॲड.माधव शितोळे देशमुख इंदापूर वकिल संघटनेचे नूतन अध्यक्ष,एकमताने झाली निवड

आय मिरर
इंदापूर येथील संघटनेचे अध्यक्ष ॲड.एन.एस.शहा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आता इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दि.16 ऑक्टोबर रोजी वकील संघटनेमध्ये पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष ॲड.एन.एस.शहा यांनी दिली.
या निवडीनंतर मावळते अध्यक्ष ॲड.एन.एस.एस.शहा यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ॲड.माधव शितोळे यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष ॲड. माधव शितोळे म्हणाले की, वकिल बांधवांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणारं आहे.इंदापूर मध्ये सिनियर डिव्हींजन कोर्ट आणि सेशन कोर्ट आणणे साठी सर्व वकिल बंधू आणि कमिटी यांचे सहकार्याने प्रयत्न करणारं आहे. त्यासाठी जेष्ठ वकिल बंधू यांचे मार्गदर्शन घेऊन कोर्टातील न्यायाधीश यांचे मार्फत आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाईल असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान ॲड. किरण धापटे. ॲड पांडूरंग जगताप. ॲड सचिन राऊत. ॲड नितीन कदम महिला प्रतिनिधी ॲड जयश्री खबाले.ॲड. टी बी पाटिल. ॲड. हेमंत नरुटे.ॲड एन जी शहा. ॲड एम एस चौधरी. ॲड के डी यादव. यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी इंदापूर वकिल संघटनेचे सिनियर आणि ज्युनिअर वकिल व महिला भगिनी हजर होत्या.सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सचिव ॲड.अशिफ बागवान व ॲड.अनिल पारेकर आणि आभार उपाध्यक्ष ॲड धैर्यशील नलवडे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड संकेत नगरे. ॲड. वैजनाथ गायकवाड ॲड. विशाल राऊत यांनी सहकार्य केले.
What's Your Reaction?






