विद्यार्थ्यांना तत्काळ भौतिक सुविधा द्या अन्यथा आंदोलन करू - अस्मिता सवाणे

Jul 31, 2024 - 14:47
 0  652
विद्यार्थ्यांना तत्काळ भौतिक सुविधा द्या अन्यथा आंदोलन करू - अस्मिता सवाणे

आय मिरर : भिगवण (नारायण मोरे)

आजच्या स्पर्धेच्या युगात सुद्धा जिल्हा परिषद शाळा नावलौकिक टिकून आहेत.जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्कृतीचा पाया मानली जाते. मोठे अधिकारी, वैज्ञानिक, राजकारणी अभ्यासकांची जडणघडण याच जिल्हा परिषद शाळेतून झाली आहे. 

शेटफळगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे.गेली अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचे शौचालयाची इमारत नादुरुस्त आहे. अनेक वेळा शिक्षक तसेच पालक यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शौचालयाचा प्रश्न सुटला नसल्याने विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण सुविधा असणे अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी क्रीडांगणाचाही अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने पालक वर्ग आता ॲक्शन मोडवर आहे. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता सवाणे यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनावर तात्काळ कारवाई करून १५ ऑगस्ट २०२४ च्या आत मध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात यावेत अन्यथा प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन करू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow