शेटफळ हवेली तलावातील जल पूजन करून राष्ट्रवादीचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न ; श्रेय्यवादाच्या लढाईत राष्ट्रवादीकडून तलावातील पाण्याचे जलपूजन

आय मिरर
पुण्याच्या इंदापुरातील शेटफळ हवेली तलावात पाणी कुणी आणलं यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या श्रेय वादाची लढाई सुरू आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेटफळ हवेली तलावामधील पाण्याचं जलपूजन करीत भाजपाला शह दिला आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी पुढे काय भुमिका घेते हे पहावे लागणार आहे.
इंदापुरातील भाजपच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नसून शेटफळ हवेली तलावात तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मुळेच पाणी आलं आहे.तालुक्यात एखाद्या गावाला टँकर चालु करायचा असेल तरी आमदारांची सही लागते.तालुक्याचे चालु आमदार दत्तात्रय भरणे आहेत आणि त्यांच्यामुळे शेटफळ हवेली तलावात पाणी आले आहे.असा दावा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केला आहे.
राज्याच्या प्रशासनात आणि मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचा ही वाटा आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हे पाणी आले आहे.ज्यांच्याकडे कोणतेही पद नसताना मी केलं म्हणण्याची प्रवृत्ती आहे खोटं बोल पण रेटून बोल म्हणत तालुक्यातील लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब करगळ,नवनाथ रुपनवर,राजेंद्र बंडगर,शिवलाल खाडे,लक्ष्मिकांत नाईक,सुरेश कोकाटे, सरपंच संतोष पवार, किशोर शिंदे,संतोष बनकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?






