शाब्बास पोलीस ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला दोन तासातच घेतलं ताब्यात
आय मिरर
इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासातचं वालचंदनगर येथून ताब्यात घेतलयं. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. याचवेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान आरोपीला ताब्यात घेतले.इंदापूर आणि वालचंद नगर पोलिसांनी मिळून संयुक्तिकरित्या ही कारवाई केली.
धिरज ऊर्फ सोन्या हनुमंत चोरमले असून तो शिरसोडी मधील असून जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली असून आरोपी कडून पोलिसांनी एक पिस्तूल ही ताब्यात घेतलयं.
इंदापूर शहरातील आय काॅलेजसमोर सोमवारी दि.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झाला आहे.
बारामती मधील घटना ताजी असताना पुण्याच्या इंदापुरामध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती.या नंतर पोलिसांनी दौंड यवत वालचंदनगर सोलापूर ग्रामीण शहर धाराशिव भागात नाकाबंदी केली होती.
या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केलाय. जखमी तरुणावर इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची देखील भेट घेतली आहे.
What's Your Reaction?