मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा कायम असतानाच विनोद तावडेंना लॉटरी ?

Nov 28, 2024 - 18:50
Nov 28, 2024 - 18:51
 0  614
मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा कायम असतानाच विनोद तावडेंना लॉटरी ?

आय मिरर

महायुतीचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, दुसरीकडे भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून (BJP) सध्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या गळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे.

कारण सध्याचे विद्यमान अध्यक्ष जे.पी नड्डा आणि त्याआधीचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपण्याआधी अशीच केंद्रीय निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे आता तावडे यांचीही निरीक्षकपदी नियुक्ती करून त्याबाबतचे संकेत पक्ष श्रेष्ठींनी दिल्याची चर्चा आहे.

मात्र, अध्यक्षपदाबाबतची कोणतीही अधिकृत भूमिका पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही नावे आघाडीवर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या आगामी मुख्यमंत्री कोण याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तरीही अद्याप सत्ता स्थापन कधी होणार याचा निर्णय झालेला नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow