लाठी चार्ज काय गोळ्या घातल्या तरी माळशिरसच्या मारकडवाडी मतदान होणार - आ. उत्तम जानकर
आय मिरर
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकड वाडी गावात प्रांताधिकार्यांनी आज पासून 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केले आहे तरीसुद्धा आमदार उत्तम जानकर यांनी गावात ठाण मांडलेला आहे. प्रशासनानं जमावबंदी लागू केली काय लाठी चार्ज केला काय आणि बंदुकीच्या गोळ्या घातल्या काय कोणत्याही परिस्थितीत उद्या मतदान प्रक्रिया पार पाडू असे म्हणत प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मारकडवाडीतील 20 जणांना प्रशासनाकडून नोटीस
उद्या 3 डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार आहे. ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची नोटीस प्राशासनाने दिली आहे.गावातील प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली.
पोलिसांनी नोटीस दिली असली तरी चाचणी मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. अशी भूमिका येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
ईव्हीएमच्या शंकेबाबत मारकडवाडी ग्रामस्थ अभिरुप मतदान घेणार आहेत. यासाठी प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची मागणी ही मारकडवाडी ग्रामस्थ यांनी केली होती. मात्र प्रशासनाने ही मागणी फेटल्यानंतर आता मारकडवाडी ग्रामस्थ मतदान घेण्यावर ठाम आहेत.
What's Your Reaction?