इंदापूरच्या सरडेवाडीत सर्व राजकीय पक्षांच्या आजी माजी नेत्यांसह पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी

Oct 23, 2023 - 18:06
 0  768
इंदापूरच्या सरडेवाडीत सर्व राजकीय पक्षांच्या आजी माजी नेत्यांसह पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी

आय मिरर

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने घेतलेली 24 ऑक्टोबर पर्यंतची वेळ संपुष्टात येत असून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावांने सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर पासून सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी नेत्यांसह पुढार्‍यांना गावात येण्यास प्रवेश बंदी घातली आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षांचे आजी-माजी नेते आणि पुढाऱ्यांना सरडेवाडी गावात येण्यास प्रवेश बंदी घातण्यात आली असून या संदर्भातील लेखी निवेदन सरडेवाडी ग्रामपंचायत आणि समस्थ ग्रामस्थांच्या वतीने इंदापूर तहसीलदार आणि इंदापूर पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.

मराठा समाजाला OBC मधून आरक्षणाची गरज असून वेळोवेळी आंदोलन करून देखील मराठा समाजाला OBC मधून आरक्षण न मिळाल्या मुळे मराठा समाजा मध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे समस्थ ग्रामस्थ सरडेवाडी यांच्या वतीने मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाचे राजकीय आजी-माजी नेते व पुढारी यांना गाव बंदी करण्यात येत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सरडेवाडीचे सरपंच सिताराम जानकर,उपसरपंच रविंद्र सरडे, ग्रा.पं.सदस्य हनुमंत जमदाडे,गोकुळ कोकरे, नामदेव तोबरे,सतिश चित्राव,परशुराम जमदाडे,संतोष लोंढे,रुषिकेश सरडे,प्रशांत सरडे,नवनाथ नायकुडे,किशोर देवकर,आसिफ शेख, अभिजित शिद,मंगेश सरडे, बालाजी शिद,भैय्या शिद,समाधान शिंदे,महादेव सरडे, विनोद शिद आदींच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow