भाजपा ओ.बी.सी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदी इंदापूरच्या गजानन वाकसेंची नियुक्ती

Sep 22, 2023 - 07:25
 0  306
भाजपा ओ.बी.सी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदी इंदापूरच्या गजानन वाकसेंची नियुक्ती

आय मिरर

भारतीय जनता पक्षात संघटनेला अतिशय महत्त्व आहे.त्यामुळे पक्षासाठी योगदान देणा-या कार्यकर्त्याची वाताहात इथे होत नाही.यापूर्वी केलेल्या कार्याची दखल घेत इंदापूर तालुक्यातील गजानन शंकरराव वाकसे यांची भाजपा ओ.बी.सी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आलीय.

वाकसे यांनी या आगोदर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,भटकेविमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस या पदावर काम केले आहे.वाकसे यांचे ओ.बी.सी घटकांवर पुर्ण वेळ केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पक्षातील वरिष्ठांकडून संघटनात्मक रचनेत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

पुर्णवेळ संघटनेसाठी काम करणारा आक्रमक युवा कार्यकर्ता अशी वाकसे यांची ओळख आहे.आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या कडून करण्यात आलेली हि निवड अतिशय महत्वाची आहे.निवडणडीची घोषणा करण्यात आल्यानंतर परीसरात युवकांनी फटाके वाजवून एकच जल्लोष केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow