इंदापूरात वाहू लागले राजकीय वारे खा.सुळेंच्या दौऱ्यानंतर हर्षवर्धन पाटीलही बावडा- लाखेवाडी गटातील नागरिकांशी संवाद साधणार
आय मिरर
इंदापूर तालुक्यात राजकीय वारे वाहू लागले असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील आसपासच्या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.यावेळी मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत सर्व कार्यकर्त्यांनी येताना आपल्या गावातील पवित्र माती घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे गाव निहाय कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी रत्नाई निवास बावडा येथे ११ ते दुपारी ४ या वेळेत कार्यकर्त्यांना व नागरिकांना भेटण्याकरता उपलब्ध असणार आहेत.
यावेळी बावडा, गणेशवाडी, सराटी, लूमेवाडी, लिंबोडी, भगतवाडी, निरनिमगाव, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, लाखेवाडी, सराफवाडी,काटी, ओझरे, गोंदी, पिंपरी बु, टणू, नरसिंहपूर,गिरवी, घोरपडवाडी हगारवाडी, शिरसटवाडी, निमसाखर, निर्वांगी, दगडवाडी, खोरोची,भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, शेटफळ हवेली, भांडगाव, अवसरी, पंधारवाडी येथील कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत.
What's Your Reaction?