Good News : पुरंदर मधील गराडे धरण 100 टक्के भरले
आय मिरर
पुरंदर तालुक्यातील सासवड सह पाच गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण आज बुधवारी शंभर टक्के क्षमतेनं भरले आहे. या धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरुवात झाली असून मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गराडे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात जाऊ लागले त्यामुळे पुरंदरच्या पश्चिम जनतेला दिलासा मिळाला आहे.
तर कऱ्हा नदी वाहू लागल्याने या नदी मधून पाणी आता नाझरे धरणात येणार आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून नाझरे धरण कोरडं असून नाझरे धरणात पाणी आले तर पुरंदरसह बारामतीतील 72 वाड्या वस्ती आणि गावे यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.
दरम्यान गराडे धरण पूर्णपणे भरल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे आणि गराडे गावचे सरपंच नवनाथ गायकवाड, यांनी या पाण्याचे पूजन केले आहे.
यावेळी भाजपचे युवा नेते जालिंदर जगताप, चांबळीचे सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, प्रगतशील शेतकरी शिवाजी जगदाळे, गोकुळ जगदाळे, माजी उपसरपंच नितीन जगदाळे, भाऊसाहेब रावडे,माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे,अविनाश जगदाळे,शहाजी कामठे,मयुर जगदाळे,मारुती कामठे, प्रकाश शेंडकर, म्हस्कु कामठे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?