जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव केतकीत दाखल
आय मिरर
"आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा" असं म्हणत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरहुन देहू कडे मार्गस्थ झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी मध्ये दाखल झाला.
या ठिकाणी गावकऱ्यांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावात या सोहळ्याचा आजचा मुक्काम असणार आहे. दरम्यान निमगांव केतकीत गावकऱ्यांसह अनेक भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रांगा लावत दर्शन घेतले.निमगांव केतकीतील संत सावतामाळी मंदिरात काही वेळासाठी श्री.तुकोबांची पालखी ठेवण्यात आली होती.
What's Your Reaction?