इंदापूर तालुक्यातील 50 कोटींच्या मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता द्या - हर्षवर्धन पाटलांचे अजित पवारांना पत्र
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील रु. 50 कोटींच्या विविध विकास कामांना तत्कालीन पालकमंत्री चंदकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि.20 मे 2023 रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र गेली 6 महिने ही विकास कामे प्रलंबित आहेत. तरी इंदापूर तालुक्यातील सदरच्या मंजूर असलेल्या रु. 50 कोटींच्या विकास कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात द्यावी, असे मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे अधिवेशनकाळात दिले आहे.
पुणे जिल्हा वार्षिक नियोजन योजना सन 2023-24 या वर्षातील इंदापूर तालुक्यातील विविध गांवाना रू. 50 कोटीचा निधी हा विकास योजना जनसुविधा, नागरी सुविधा, 3054 रस्ते, 5054 रस्ते, 'क' वर्ग तार्थक्षेत्र विकास, नाविन्यपुर्ण योजनेतून कुस्ती आखाडा सुधारणा/बांधकाम, शाळा /अंगणवाडी सुधार, महावितरण आदी योजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निधी मंजूर केलेला आहे.
निधी मंजुर झालेली गावे पुढीलप्रमाणे : भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, मदनवाडी, कुंभारगाव, शेटफळगढे, निरगुडे, अकोले, लाकडी, निंबोडी, भवानीनगर, सणसर, घोलपवाडी, मानकरवाडी, पवारवाडी, थोरातवाडी, उद्धट, तावशी, कुरवली, जांव, चिखली, कळंब, परीटवाडी, चव्हाणवाडी, कर्दनवाडी, वालचंदनगर, रणगाव, लासुर्णे, बेलवाडी, जाचकवस्ती, अंथुर्णे, जंक्शन, शेळगाव, गोतोंडी, हगारवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, निमगाव केतकी, गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, वरकुटे खु., रेडा, रेडणी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, लाखेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, टणू, नरसिंहपूर, भांडगाव, अवसरी, भाटनिमगाव, भोडणी, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, वडापूरी, काटी, पंधारवाडी, बाभुळगाव, हिंगणगाव, कांदलगाव, तरटगाव, शहा- महादेवनगर, शिरसोडी, पिंपरी, आगोती-सुगाव, पडस्थळ, कालठण नं.1, कालठण नं.2, गंगावळण, आजोती नं.1, वरकुटे बु., कळाशी, पळसदेव, बांडेवाडी, भावडी, काळेवाडी, डाळज नं.1, डाळज नं.2, डाळज नं. 3, बावडा, लोणी देवकर इत्यादी गावातील विविध विकास कामांचा मंजूर कामामध्ये समावेश असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
वरील सर्व गावांमधील विविध विकास कामांसाठी रु. 50 कोटीचा निधी हा जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेला आहे. तरी मंजूर झालेल्या सदरच्या 50 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे पालकमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले आहे.
What's Your Reaction?