दत्त देवस्थानच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही - खासदार सुप्रिया सुळे
आय मिरर
शहाजीनगर रेडा येथिल दत्त देवस्थान हजारों भक्तगणांचे श्रद्धास्थान असून,या देवस्थानच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
दत्त देवस्थान शहाजीनगर येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहातील(ता.२५ डिसेंबर) सोमवार रोजी श्रींची दर्शन व संध्याकाळची आरती महापूजा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी माजी सभापती प्रविण माने,राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते,तानाजीराव गायकवाड यांनी स्वागत केले.
पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,धार्मिक संस्कार फक्त हरीनातूनच होतात.दत्त देवस्थानच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून अन्नदान,हरीनाम,तसेच गुरुचरित्र अखंड हरिनाम सुरु आहे याचा मनोमन आनंद वाटतो.भक्त गणांना ज्या सुख - सुविधा कमी असतील त्या पुर्ण करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे अशीही माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
लवकरच आराखडा तयार करुन कामे मार्गी लावली जातील.येथिल चैतन्य मनाला समाधान देणारे आहे.त्यामुळे मी पून्हा दर्शनाला येईल असाही शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार पांडूरंग मोहिते यांनी मानले.
What's Your Reaction?